Saturday, May 8, 2021

कोविड 50 लाख सानुग्रह अनुदान प्रस्ताव बाबत

 *कोविड-19 मुळे मृत्यु झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांनी 50लाख रु सानुग्रह लाभ मिळण्यासाठी लागणारे कागदपत्रे* 


Documents required by the family of the teacher who died due to covid to get Rs 50 lakh sanugraha benefit

कोविड-१९

कर्तव्यावर असतांना कोविड मुळे मृत्यु झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबीयांनी (नॉमिनेशन असलेल्या व्यक्तिने) 50लाख रु सानुग्रह लाभ मिळणेबाबत सादर करावयाच्या प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे

संदर्भ:-

1) वित्त विभाग शासन निर्णय दिनांक- 29/05/2020

2) वित्त विभाग शासन निर्णय 14/10/2020

3) शालेय शिक्षण विभाग परिपत्रक दिनांक 07/12/2020

4) आरोग्य सेवा आयुक्तालय, पुणे यांचे पत्र 7833-7943/2021 दिनांक 28/ 04/ 2021

 

वरील शासन निर्णयाचा (जा.क्र. सहित) उल्लेख प्रत्येक कवरिंग लेटर (अर्जदार चे विनंती अर्ज, BEO चे कवरिंग, शिक्षणाधिकारी यांचे कवरिंग इत्यादि) मधे यायला हवा.

कुटुंबीयांचा 50लाख रु मागणी अर्ज व त्यासोबत.


1.मयत शिक्षकाचे मृत्यु प्रमाणपत्र (मुळ प्रत.)

2.त्यांचा कोविड रिपोर्ट पॉजिटिव असल्याचे RTPCR /एन्टीजन टेस्ट प्रमाणपत्र..

3.सदर मृत्यु कोविड मुळे झाला असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र

4.शिक्षकाची कोरोना ड्यूटी संबंधिची आर्डर.

5.तहसीलदार/BDO यांचे प्रमाणपत्र

सदर शिक्षक हे दिनांक- .... रोजी पासून  .... पर्यंत कोरोना कर्तव्यावर कार्यरत होते , कर्तव्य बजवतांना किंवा कर्तव्य बजवल्या नंतर 14 दिवसांच्या आत म्हणजे दिनांक- ...... रोजी त्यांचा कोविड मुळे मृत्यु झालेला आहे.


किंवा


......सदर शिक्षक दि ...... पासून ...... पर्यंत कोविड ड्यूटी कर्तव्यावर होते, कर्तव्य बजवल्यानंतरच्या 14 दिवसांच्या आत म्हणजे दिनांक...... रोजी ते कोविड आजारामुळे हॉस्पिटल मधे दाखल झाले व दि-..... रोजी त्यांचा कोरोना मुळे मृत्यु झाला. सदर दाखला त्यांचे वारसदार ..... यांना शासनाच्या 50लाख रु सानुग्रह लाभ मिळणे बाबत देण्यात येत आहे...)


6.मयत शिक्षकाचे सेवपुस्तक नामनिर्देशन पानाची BEO द्वारा अटेस्टेड XEROX प्रत.

7.सेवा पुस्तक प्रथम पानाची XEROX (BEO अटेस्टेड), प्रथम/कायम झाल्याचे नेमणुक आदेश.

8.ना देय, ना चौकशी दाखला.

9.मयत कर्मचाऱ्याचा वारस दाखला (मुळ प्रत.)

10. एका पेक्षा जास्त वारसदार असल्यास अर्ज करणाऱ्या वारसदारास इतर वारसदार यांनी 50लाख रु दावा/लाभ बाबत "संमतीपत्र/ प्रतिज्ञापत्र" म्हणजेच NOC (No Objection Certificate)

(इतर वारसदार यांनी 100रु स्टैम्प पेपर वर Affidavit करून द्यावे.)

11.नॉमिनी व्यक्ति जे अर्ज करत आहेत त्यांचे आधार, ID, रेशन कार्ड इत्यादि Xerox.

12.अर्जदार यांचे बैंक अकॉउंट details, सोबत पासबुक Xerox.

13. वरील प्रस्तावास BEO चे कवरिंग करून ते शिक्षणाधिकारी यांचे कडे पाठवावे.

14. शिक्षणाधिकारी यांनी तो आपले कवरिंग लावून व वरील शिक्षण विभागाचे संदर्भीय परिपत्रक लावून शिक्षण संचालक (प्राथ.) पुणे किंवा शिक्षण उपसंचालक ,यांच्या मार्फ़त किंवा डायरेक्टली शालेय शिक्षण मंत्रालय मुंबई येथे पाठवावा.)

 

(टिप:- सदर शासन निर्णया नुसार कोविड कर्तव्यावर असतांना मृत्यु झालेल्या कर्मचार्यांसाठी वरील शासन निर्णय लागू आहे)

 

प्रस्तावा सोबत जोडलेली आवश्यक कागदपत्रे यांचे चेकलिस्ट सुरुवातीस अनुक्रमणिका करून जोड़ावी.

2 comments:

  1. add annual planing and unit plan

    ReplyDelete
  2. Annual plsnning is available at वार्षिक व मासीक नियोजन page ,plz visit

    ReplyDelete